Uncategorized

पुलाला पडलय मोठे भगदाड, त्यातुन वाहतय पाणी ; माणुस वाहुन जायची वाट बघताय का ?

करमाळा समाचार

तालुक्यातील वरकुटे परिसरात दोन दिवसांपुर्वी झालेल्या जोराच्या पावसानंतर वरकुटे – पाथुर्डी रस्त्यावरील अगोदरच दुरावस्था झालेल्या पूलावर रस्त्यात भगदाड पडले आहे.

पूलाच्या दुरवस्थेमुळे या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला असून पूल कधी दुरुस्त होणार, असा सवाल नागरिक विचारु लागले आहेत.

वरकुटे नजीकच्या ओढ्यावर सदर पूल असून गेली कित्येक वर्षे वरकुटे – पाथुर्डी रस्त्याकडे दुर्लक्षच झाल्याने रस्त्याबरोबरच पूलाचीही वाताहत झालेली आहे. जुलै महिन्यात सदर रस्ता व पूल दुरुस्त होण्यासाठी नागरिकांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडे मागणी निवेदने सादर केली आहेत. आता पुन्हा पावसाच्या तडाख्याने पूलाच्या नुकसानीत भर पडली आहे.

ads

सदर रस्ता व पूल दुरूस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे.

जवळचा रस्ता म्हणून या रस्त्यावर सतत वर्दळ असते. परंडा ते टेंभुर्णी, अकलुज हा जवळचा मार्ग याच रस्त्यावरून जातो. शिवाय वरकुटे येथील शेतकरी या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे हा रस्ता खूप गरजेचा आहे. पूल ढासळण्याच्या परिस्थितीत असून तो ढासळल्यास या रस्त्यावर राहणाऱ्या शेतकऱ्यांचा गावाशी संपर्क तुटु शकतो. मागणी करुनही

सदर रस्ता व पूल दुरूस्ती न झाल्यास आंदोलन उभारले जाईल. असे कुमार पाटील यांनी सांगितले आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE