करमाळासोलापूर जिल्हा

कोरोना रुग्णांसाठी महत्वाची बातमी ; बील जास्त आलेय का ? आमच्याशी संपर्क साधा – शिंदे

करमाळा समाचार

कोरोना महामारीच्या कार्यकाळात अनेकांना आरोग्याच्या समस्या बरोबर आर्थिक झळ सोसावी लागली आहे. यातून मुक्तता व सवलत मिळावी या हेतूने जन आरोग्य अभियान व एकल महिला पुनर्वसन समिती यांच्या माध्यमातून आर्थिक ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. याबाबत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या तालुक्यात कोरोनाकाळात रुग्णालयात ज्या पेशंटची बिले १ लाखापेक्षा जास्त आली आहेत.त्यांचे सर्वेक्षण कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती, जन आरोग्य अभियानाच्या मदतीने करत असून करून त्याचा अहवाल सरकारला सादर करतो आहे. जर आपल्या जिवंत किंवा मृत पेशंटचे बिल १ लाखापेक्षा जास्त आले असेल तर आपण संपर्क करावा.फोनवर ही आपली माहिती घेतली जाईल.या बिलांचे नंतर ऑडिट ही करण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल

खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा :-
ऍड. सविता शिंदे, विजया कर्णवर, संजय घोलप
तालुका — करमाळा जिल्हा– सोलापूर
फोन नंबर 9767211309

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE