करमाळासोलापूर जिल्हा

लाचलुचपत पोलिसावर कारवाई ; कारवाई कोणावरही होतेच पोलिस असलातरी – तक्रार करा

प्रतिनिधी करमाळा


येथील एका पोलीस कर्मचाऱ्यांना लाच लुचपत विभागाच्या वतीने रंगेहात पकडण्यात आले आहे. सदरच्या कर्मचाऱ्याने तक्रारदाराच्या पत्नीला अटक न करण्याच्या व गुन्ह्यात मदत करण्याच्या अटीवर तक्रार दाराकडून दहा हजार लाचेची मागणी केली होती. सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या पथकाच्या वतीने करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी चार च्या सुमारास करमाळा पंचायत समीती आवारात करण्यात आली आहे.याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शशिकांत तुकाराम वलेकर (वय ४९) यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्यासह पत्नी व मुलावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास हे वलेकर करत होते. त्या गुन्ह्यात मध्ये तक्रारदार यांची पत्नीला अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी कोळेकर यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. त्याचा पहिला टप्पा म्हणून सात हजार रुपये इतकी रक्कम स्वतः पंचायत समिती परिसरात वलेकर यांनी स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर युनिटच्या वतीने कारवाई करण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग पुणे राजेश बनसोडे व अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस हवालदार शिरीषकुमार सोनवणे, पोलीस नाईक प्रमोद पकाले, पोलीस नाईक अतुल घाडगे यांच्या पथकाच्या वतीने करण्यात आली आहे.

कायदा सर्वांना सारखा … कारवाई होतेच 
आपले काम करून घेण्यासाठी कोण लाचेची मागणी करत असेल. तर न घाबरता समोर या पोलीस असेल किंवा महसूल विभाग कारवाई सर्वांवर होते. तक्रार केल्यानंतर आपले काम होणार नाही अशी भीती बाळगू नये. लाचखोर अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार आल्यानंतर संबंधित तक्रारदाराचे काम करून घेण्याची जबाबदारी ही आम्ही स्वीकारतो. त्यामुळे न घाबरता तक्रार करण्यास समोर आले पाहिजे. त्यासाठी १०६४ हा टोल फ्री क्रमांक असून यावर आम्हाला संपर्क करावा.
संजीव पाटील, पोलीस उपाधिक्षक, लाचलुचपत विभाग सोलापूर.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE