कनिचे यांची ग्राम सवांद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य माढा तालुका उपाध्यक्षपदी निवड
करमाळा समाचार
दि.२६ ग्राम संवाद सरपंच संघाच्या ग्रामपंचायती मधील विविध योजना आणि मागणीसाठी पंढरपूर येथील बैठकीत प्रदेशाध्यक्ष मा. श्री. अजिनाथ धामणे, प्रदेशउपाअध्यक्ष मा. श्री. प्रमोद भगत, प्रदेश सचिव मा. श्री. विशाल लांडगे, कु. कोमल ताई करपे महिला प्रदेशउपाध्यक्ष, श्री. सुनील राजमाने सोलापूर जिल्हा अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश भुई, पश्चिम महाराष्ट्र संघटक भास्कर भोसले यांच्या नेतृत्वाखाली सरपंच संघाच्या माढा तालुका उपाध्यक्षपदी श्री. अजिनाथ मनोहर कनिचे यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली.

या निवडबद्दल अजिनाथ कनिचे यांचे तालुक्यातील व जिल्यातील आजी – माझी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, या वेळी अजिनाथ कनिचे यांनी सर्वांचे आभार मानले.

व ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य या सरपंच संघाच्या माध्यमातून तालुक्याच्या व गावच्या सर्वांगीण विकासासाठी आजी – माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ त्यांना त्यांचे अधिकार व कार्य याची माहिती देऊन व मार्गदर्शन करून योग्य न्याय व हक्क मिळवून देणे शासनाच्या विविध योजना तालुक्यात व गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवणे करिता मी कायम प्रयत्न करणार आहे असा विश्वास व्यक्त केला.