सहा महिन्यापूर्वी बांधलेल्या पुलाची दुरावस्था ; संरक्षक कठड्याला तडे
वाशिंबे प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील दळणवळणाच्या द्रुष्टीने महत्त्वाच्या केतूर-पोमलवाडी गावाला जोडणाऱ्या भीमा नदीवरील पुलाची दुरावस्था झाली असून पूलाच्या संरक्षण भिंतीला ठीक ठिकाणी तडे गेले आहेत. बऱ्याच प्रतीक्षेनंतर हे काम सहा महिन्यापूर्वी झाले आहे. परंतु सहा महीन्यातच पूलाच्या संरक्षण भींतीला तडे गेले असून पूलाची अवस्था अत्यंत दयनिय झालेली आहे.

*पारेवाडीच्या मुलीचा बारामतीत छळ ; पतीसह सासु सासरऱ्यांवर गुन्हा दाखल*
https://karmalasamachar.com/parewadis-daughter-tortured-in-baramati-case-filed-against-in-laws-along-with-husband/
यापूलावरून दररोज शाळकरी विद्यार्थी ये-जा करत असतात तसेच साखर कारखाने सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक देखील पूलावरून होत आहे. त्यामुळे मोठी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कामासाठी शासनाने करोडो रुपये खर्च केले आहेत. तरीही पुलाची ही अवस्था झाल्याने नागरीकांनकडून संताप व्यक्त केला जात आहे. व संबंधित कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

पोमलवाडी केतूर गावाला जोडनार्या पूलाच्या संरक्षण भींतीला तडे गेल्याची माहीती मिळाली आहे. परंतु मुख्य पूलाला कसल्याही प्रकारचा धोका नाही.संबंधित ठेकेदारांला तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात येईल.
के, एम, उबाळे. उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा.