करमाळासोलापूर जिल्हा

पारेवाडीच्या मुलीचा बारामतीत छळ ; पतीसह सासु सासरऱ्यांवर गुन्हा दाखल

करमाळा समाचार 

लग्न झाल्यानंतर दोन महिन्यापासूनच माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणत सासरच्या मंडळीने त्रास दिल्याप्रकरणी बारामतीच्या (baramati) तिघांवर करमाळा (karmala) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पारेवाडी तालुका करमाळा येथील विवाहितेने सदरची तक्रार करमाळा पोलीस ठाण्यात दिली आहे.

पारेवाडी (parevadi) तालुका करमाळा येथील मुलीचा विवाह जुलै 2021 मध्ये शारदानगर बारामती येथील प्रीतम जगताप (pritam jagtap) यांच्याशी झाला होता. लग्नाच्या पंधरा दिवसानंतर संसार उपयोगी वस्तूंसाठी 80 हजार रुपये दिले होते. त्यानंतर पती प्रीतम जगताप यांनी सदर विवाहीतेला सेंट्रींग कामासाठी दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून मला वारंवार त्रास देऊन शिवीगाळ दमदाटी करू लागले. शारीरिक मानसिक त्रास देऊन उपाशीपोटी ठेवू लागले. आई वडील गरीब असल्याने पैसे देऊ शकले नाही.

त्यासर्व त्रासाबाबत मुलीने सर्व कल्पना घरच्यांना दिली. त्यानंतर पैसे देणे होत असेल तरच घरी राहा नाहीतर निघून जा असे सांगून सासू-सासर्‍यांनी त्रास देऊ लागले. दरम्यानच्या काळात मुलीच्या आई-वडिलांनी पती प्रितम यांना तुमचे पैसे देतो पण माझ्या मुलीला मारू नका असे सांगत होते. परंतु सासरचे मंडळी ऐकण्याच्या भुमीकेत नव्हते. काही दिवसानंतर पाहुण्यांच्या मध्यस्थीने मुलगी नांदवण्यास पाठवली पण तरीही तीला घरात घेतले नाही. अखेर मुलगी आई वडीलांसह पारेवाडी येथे राहत आहे.

याप्रकरणी पती प्रितम जगताप, सासरे संजय जगताप व सासु मंगल जगताप रा. शारदा नगर बारामती जि. पुणे (dist pune) यांच्यावर करमाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सासु सासरे व पती विरोधात तक्रार दाखल केली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE