करमाळ्याच्या सामाजिक कार्यकर्त्याचा पुरस्कार देऊन सन्मान ; खा. संजय राऊत, मंत्री शिंदे यांच्या हस्ते सन्मान
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण शिवसेना नेते एकनाथ शिंदे व शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते ठाणे येथील घाणेकर सभागृहात रविवारी वितरण होणार आहे.

प्रमोद झिंजाडे हे गेली तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. कोरोना काळात हातावर पोट असणाऱ्या जवळपास चौदा हजार हजार कुटुंबांना मोफत किराणा साहित्य उपलब्ध करून दिले होते. तसेच कोरोनाच्या काळात रोजगार हमी योजनेचे कामासंदर्भात जास्तीत जास्त काम सुरू करणेसाठी एक हजार पेक्षा जास्त सरपंचना वेबीनार द्वारे मार्गदर्शन केले. यामध्ये श्री कोंढाळकर एम. एन. पुणे. शरद आरगडे नेवासा यांनी सहकार्य केले.

तसेच रोजगार हमीचे सोलापूर (करमाळा), औरंगाबाद (वैजापूर), गडचिरोली, कोल्हापूर ( शिरोळे), सांगली ( वाळवा) येथे उपलब्ध करून देण्याचे काम केले. त्यांच्या संस्थेचे कार्य क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असून मुंबई, पुणे, सोलापूर, नांदेड, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली याभागातील शहरी व ग्रामीण भागातील गोर गरीब गरजूंना दलित भूमीहीन, एकल महिला, तृतीयपंतीय, कुष्ठरोग, भटके, रिक्षाचालक इ. कोरोनाच्या काळात मोफत अन्नधान्य तसेच डॉक्टर व पोलिसांना आरोग्य साहित्य उपलब्ध करून दिले. या कामासाठी केअर इंडिया, सीडस इंडिया तसेच वैयक्तिक पातळीवर देणगीदार तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्थानिक सामाजिक संस्थाचे खूप सहकार्य लाभले.
करमाळा येथे शिवसेनेच्या वतीने सुरू असलेल्या शिवभजन योजनेसाठी लाखो रुपयांचा निधी दिला होता. प्रमोद बाबा झिंजाडे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल करमाळा शहर व तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.