करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

संभाजी बिडी विरोधात शिवधर्म फॉऊंडेशन, करमाळा कर्जत ; करमाळ्यात करणार उपोषण

प्रतिनिधी- सुनिल भोसले 

छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाने बिडी चे उत्पादन केले जात असून संभाजी बिडी या उत्पादनाचे नाव बदलण्यात यावे. तसेच संबंधित कंपनी मालकावर योग्य ती कारवाई करावी. यासह The emblems and names act 1950 नुसार छत्रपती संभाजी महाराज व इतर सत्यशोधक महापुरुषाचे नाव समाविष्ट करण्यात यावे यासाठी दिनांक 4 रोजी करमाळा येथे तहसील कार्यालय परिसरात शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आद्य पुरुष आहेत. त्यांची ख्याती जगविख्यात आहे. संभाजी महाराज हे फक्त योद्धे नाहीतर महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार आहेत. तसेच एक उत्कृष्ट लेखक देखील होते. अशा प्रेरणादायी कारकीर्द महामानवाचे धूम्रपान करण्याचे एक साधन असलेल्या नाव देऊन साबळे वाघिरे आणि कंपनी मालक हे महाशय तमाम महाराष्ट्रातील युवकांना आकर्षित करून आपला व्यवसाय वाढवीत आहेत. परंतु या महाशयांनी महाराष्ट्रातील बहुजनांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला आहे.

तसेच महाराष्ट्र राज्यातील तमाम बहुजनांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी आपण संभाजी महाराजांचे नाव वापरून धूम्रपान करण्याचे साधन उत्पादन करणाऱ्या कंपनी मालकावर ती योग्य ती कारवाई करावी, या आशयाचे निवेदन यापूर्वीही दिले होते. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे नाव व इतर सत्यशोधकांचे नाव The emblems and names act 1950 प्रमाणे समाविष्ट करावी. जेणेकरून त्यांचा नावाचा चुकीचा वापर होणार नाही. या मागण्यांसाठी दिनांक 4 सप्टेंबर रोजी रोजी तहसील आवारात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात येणार आहे.

सचिन नेटके , सचिन खुडे , संदिप धुमाळ , भाऊसाहेब सोरटे , भरत खुडे , आदीत्य शहाणे, अशपाक जमादार, करमाळा व कर्जतचे पदाधिकारी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE