करमाळासोलापूर जिल्हा

बिबट्याची नागरिकांवर दहशत कायम, तरीही वनविभाग सुस्तच

करमाळा समाचार

सातोली ता. करमाळा येथे बिबट्याची दहशत कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. काल (ता.१६) रात्री सातोली शिवारातील संजय कुंडलिक गाडे यांच्या कुत्र्यावर हल्ला करून बिबट्याने कुत्रा फस्त केला आहे. त्याचे ठसे पुन्हा त्याच परिसरात आढळून आले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. बिबट चा अजूनही मुक्काम तिथेच असल्याचे सिध्द होत आहे. त्यामुळे सातोली,वडशिवणे, केम, कंदर, दहिवली व उपळवटे परिसरात बिबट्याच्या दहशतीचे वातावरण आहे.

मागील काही दिवसांपूर्वी वडशिवणे, सातोली शिवारातच बिबट्याने जवळपास 20ते 25 जणांना दर्शन दिलेले आहे. त्यामुळे सर्वांची शेतातील कामे खोळंबलेली आहेत व ऊसतोडणी देखील थांबलेली आहे. सध्या ऊसतोडणी सुरू असल्याने परजिल्ह्यातील मजूर उघड्यावर कोपी करून राहत असल्याने त्यांच्याही कुटुंबाला धोकाच आहे व ऊसतोडणी ही काही ठिकाणी थांबल्याचे दिसत आहे.नागरिकांच्या सुरक्षेची नेमकी जबाबदारी कोणाची, असे असतानाही वनविभाग अजूनही सुस्तच का आहे असा नागरिकांना प्रश्न निर्माण झाला आहे.

वनविभागाने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून तातडीने परिसरात पिंजरे लावून बिबट जेरबंद करावा अशी मागणी भाजपा चे करमाळा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी केली आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE