करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्यात दरोडेखोरांची दहशत ; प्रजासत्ताकदिनाच्या पहाटे बागवान यांच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न ;मारहाणीत दोन जखमी

करमाळा समाचार 

अहमदनगर टेंभुर्णी रस्त्यावर नालबंद मंगल कार्यालया शेजारी असलेल्या फळ विक्रेत्या मोहम्मद इब्राहिम बागवान यांच्या घरावर दरोडेखोरांनी हल्ला करून दोन जणांना जखमी केले आहे. सदर चा हल्ला प्रजासत्ताक दिना दिवशी पहाटे तीनच्या सुमारास घडला आहे. सुदैवाने या घटनेत जखमी त्यातून सावरले आहेत. तर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

मोहम्मद बागवान हे रोज पहाटे तीनच्या सुमारास देवपूजा करुन आपल्या दुकानात जात असतात. त्यामुळे ते नेहमी प्रमाणे पहाटे तीनच्या सुमारास उठले होते. स्वतःच्या रूममधून हॉल कडे येत हॉलचा दरवाजा उघडला. त्या हॉल मध्ये पोहोचण्यापूर्वीच त्या ठिकाणी नऊ ते दहा दरोडेखोर दरवाज्याची कडी उचकटुन आधीच हॉलमध्ये येऊन बसलेले होते.

अचानक समोर बसलेली मंडळी पाहून बागवान हे दबकले त्याच वेळी त्यापैकी एकाने बागवान यांच्या डोक्यात, हातावर, पायावर लाकडाने मारण्यास सुरुवात केली. यावेळी ते जखमी होऊन खाली पडले. यावेळी ओरडल्याचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा त्या ठिकाणी पोहोचला. त्याने वडिलांना उचलून बाजूला घेण्यापूर्वी त्याला समोर उभा असलेले आठ ते नऊ दरोडेखोर दिसले. यावेळी त्यांनी वडिलांना मागे सरकवत हॉल मध्ये घुसून आतल्या बाजूने कडी लावून घेतली.

त्यानंतर त्यातील तीन ते चार दरोडेखोर हे लाकडी दांडक्याने त्यांचा मुलगा सद्दाम याला मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पाठीवर, डोक्या, मानेवर व पायावर मारहाण झालेला सद्दाम तरीही त्यांच्याशी झुंज देत होता. दरम्यान सद्दाम चे वडील महंमद यांनी मागील दरवाजाने आपल्या भावाचे घर गाठले. त्या सर्वांना उठून पुन्हा एकदा घराकडे येऊ लागले. या वेळी रस्त्यात दगड उचलून सर्वांनी दरोडेखोर असलेल्या घरावर मारण्यास सुरुवात केली. यावेळी लोक येत असल्याचे पाहून दरोडेखोर घाबरले व तेथून पळू लागले.

घराच्या बाहेर पडून सर्वजण पळत असताना त्यांच्यामागे बागवान व इतर लोक दगड घेऊन पळत होती. याच दरम्यान त्यातील एका दरोडेखोरांनी शेतात मध्ये थांबून उलट बागवान यांच्या वर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांची दगडे चुकून बागवान यांनी पुन्हा एकदा त्याचा पाठलाग केला. परंतु तोपर्यंत सर्व दरोडेखोर पळून गेले होते. सुदैवाने या मध्ये मारहाण झालेले मंडळींना जखमी केले असले तरी मोठा अनर्थ टळला आहे.

सुरुवातीला मुख्य दरवाच्या कडी उचकटुन आत प्रवेश केल्यानंतर हॉलचा दरवाजा उघडण्यात अपयश आले. त्यामुळे संबंधित दरोडेखोर हे वाट पाहत बसले होते. आत प्रवेश केला असता तर आज घरातील महिला लहान मुले व पुरुषांच्या जिवाल तर धोका होताच शिवाय मुद्देमाल ही पळवून नेण्यात हे दरोडेखोर यशस्वी झाले असते. विशेष म्हणजे संबंधित घराशेजारी ईतर घरे व गजबजलेला भाग असतानाही ही या ठिकाणी धाडसी चोरी करण्याचा हा प्रयत्न चोरांना सध्यातरी अंगलट आला असला तरी परिसरात अशा प्रकारचे चोऱ्या होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी या भागात गस्त वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE