करमाळासोलापूर जिल्हा

नेमके कशामुळे आपण आजही अपक्ष असल्याचे सांगतो हे आ. संजयमामांनी केले स्पष्ट ; त्यावर काय म्हणाले मंत्री जयंत पाटील ?

करमाळा समाचार 

 

करमाळा येथे आज राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी प्रास्ताविक करताना आजपर्यंतच्या सर्व घडामोडी पक्षश्रेष्ठींकडे मांडल्या. वास्तविक पाहता संजय मामा शिंदे हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी राष्ट्रवादीशी त्यांची जुळलेली नाळ पुन्हा एकदा दिसून आली. यावेळी त्यांनी सर्वांचा यथोचित सन्मान करत नेमके कशा पद्धतीने आपण पक्षापासून थोडेसे वेगळे होऊन अपक्ष निवडणूक लढवली याबाबत भाष्य केले.

यावेळी बोलताना संजयमामा शिंदे आज पर्यंत चा वृत्तांत सांगत असताना नेमकी कारणे समोर करत सर्वांची मनं जिंकली. यावेळी संजय मामा शिंदे यांनी आपण कशा पद्धतीने राष्ट्रवादीची जोडलेले आहोत व कशामुळे पक्षातून बाहेरून उमेदवारी घेत आपण निवडणूक लढवली व हे करत असताना पक्षातील कोणत्या नेत्यांसोबत आपल्या चर्चा झाल्या होत्या या संदर्भात सर्व घडामोडी सर्वांपुढे बोलून दाखवल्या.

आमदार शिंदे यांनी सुरुवातीचा काळ ग्रामपंचायतीचे राजकारण ते जिल्हा परिषद अध्यक्ष पर्यंत घडलेल्या घडामोडी व शरद पवार साहेब यांच्यासह पक्षाची जोडलेली नाळ किती घट्ट आहे हे बोलून दाखवले. तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी ही सुरुवातीला ज्येष्ठ नेते पवार साहेब हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होत्या पण अचानक त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने संजय मामा शिंदे यांचे नाव पुढे येऊ लागले. हा पक्ष कार्यालयातून आलेला हा आदेश होता. त्यामुळे केवळ एका फोनवर आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याबाबत होकार दिला होता. पुढे काय होईल याचाही क्षणाचा विचार आपण केला नसल्याचं यावेळी शिंदे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभाचा बिगुल वाजला यादरम्यान स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी आपणास उभा राहण्याचा आग्रह धरला. तर करमाळा व माढ्यातील राजकारणात मातब्बर असलेली करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप व माढ्याचे माजी आमदार धनाजी साठे या दोन्ही नेत्यांसोबत चर्चा झाली. यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवारी घेण्याचा आग्रह धरला व निवडून आल्यानंतर गरज भासल्यास देवेंद्र फडवणीस हे आमदार मुख्यमंत्री होणार असतील तर पाठिंबा द्यावा लागेल अशी ही विनंती केली होती. त्यामुळे त्यांना दिलेला शब्द पाळण्या खातिर सुरुवातीला पाठिंब्याचे पत्र बीजेपीला दिले होते. नंतर महाविकास आघाडी सरकार बनले त्यामुळे आपण सरकारला पाठिंबा दिला मात्र आजतागायत आपण राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा दिलेला असला तरी अपक्ष असल्याचे सांगत आलो आहोत.

सदरच्या स्पष्टीकरणानंतर मंत्री जयंत पाटील यांनी तुम्ही अपक्ष वगैरे हे डोक्यातून काढून टाका तुम्ही राष्ट्रवादीचेच आहात असे ठामपणे लक्षात ठेवून इथून पुढे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होऊन पक्ष बळकटीसाठी काम करा असे आवाहन केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE