करमाळ्यातील लालपरी पुन्हा जोमात ; उद्या पासुन फेऱ्या वाढणार
करमाळा समाचार
मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे रुतलेले चाक पुन्हा एकदा सुरु होण्याच्या मार्गावर आहे. त्या अनुषंगाने करमाळ्यातील बस गाड्यांच्या फेऱ्या सुरू झाले आहेत. मंदावलेली बाजारपेठ पुन्हा एकदा फुलणार आहे.

करमाळा आगाराच्या वतीने पुणे व इतर गाड्या सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये करमाळा अजंठानगर, गौडरे- करमाळा -अजंठा नगर, करमाळा आनाळा – पुणे, बार्शी, नगर, सोलापूर, नाशिक, टेंभुर्णी अशा गाड्यांचा समावेश आहे.

मागील अनेक दिवसांपासून एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातून शहराकडे लोकांची ये-जा ठप्प झाली होती शिवाय विद्यार्थी व रुग्णांना बंद एस टी चा त्रास सहन करावा लागत होता. पण आता कर्मचारी पुन्हा एकदा हजर झाल्याने सदरच्या फेऱ्या सुरू करण्यात आले आहेत.
या फेऱ्यामुळे शहरात रेलचेल तर वाढणारच आहे. त्यामुळे मंद झालेली बाजारपेठ पुन्हा एकदा प्रगती वर येईल अशी चिन्हे आहेत. कोरोना नंतर एस टी कर्मचाऱ्यांनी घेतलेली भूमिका यातून व्यापारी व छोटे दुकानदार अडचणीत सापडले होते. पण आता पुन्हा एकदा सर्व काही सुरू होईल व व्यवस्थित होईल अशी अपेक्षा आहे.