करमाळासोलापूर जिल्हा

आपाआपसातले राजकीय मतभेद विसरून पारेवाडीकरांची एकी ; भुमिपुजनाला आलेल्या आ. शिंदेंनी दिले आश्वासन

करमाळा समाचार – संजय साखरे

पारेवाडी ता करमाळा येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीराच्या बांधकामाचे व आमदार निधीतून बांधण्यात येणाऱ्या नियोजित सभा मंडपाचे भूमिपूजन आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील ह .भ. प धोंडोपंत दादा मठाचे प्रमुख ह. भ. प सुरवसे महाराज होते .

पंढरपूर येथील धोंडोपंत दादा यांच्या फडावर जी काही प्रमुख गावे आहेत यामध्ये पारेवाडी चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. येथील ग्रामदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लोकसहभागातून करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे. याच कामाचे भूमिपूजन आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.

यावेळी बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे, सूर्यकांत पाटील ,हरिभक्त परायण सुरवसे महाराज, ह. भ. प हांडे महाराज, मकाई सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन बाळासाहेब पांढरे, तानाजी बापू झोळ, उद्धव दादा माळी, महादेव नवले ,सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक अशोकरावजी पाटील, गणेश गुंडगिरे, हिंगणीचे सरपंच हनुमंत पाटील, डॉ गोरख गुळवे, दिवेगव्हाणचे सरपंच भरत खाटमोडे, अजित विघ्ने, लक्ष्मीकांत पाटील, सरपंच अमोल दुरंदे, दादासाहेब निकम, बाळकृष्ण भाऊ सोनवणे ,राजेंद्र धांडे, मारुती सोनवणे सर ,रामदास गुंडगिरे,पारेवाडी चे सरपंच महादेव पांढरे यांच्यासह परिसरातील नागरिक व पारेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम .व्ही गुंडगिरे यांनी केले तर आभार अमोल मोरे यांनी मानले.

राजकीय मतभेद विसरून पारेवाडीकरांची एकी- 
तालुक्यातील तीनही राजकीय गटातील कट्टर प्रतिस्पर्धी लोक पारेवाडीत आहेत, परंतु गावातील धार्मिक कार्यासाठी हे तीनही गट आपापसातील राजकीय मतभेद विसरून एकत्र आल्याचे या निमित्ताने पाहायला मिळाले. चव्हाण -गुंडगिरे वस्ती वरील रस्त्यासाठी निधी – पारेवाडी गावातील चव्हाण व गुंडगिरे वस्तीवर जाणारा रस्ता हा अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणे लोकांना खूप गैरसोयीचे ठरत आहे . याशिवाय ऊस वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्यासाठी लवकरच निधीची तरतूद करून काम सुरू करू असे आश्वासन आमदार शिंदे यांनी दिले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE