करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

कोरोनात पालक गमावलेल्या पाल्यांस मिळणार शैक्षणिक अर्थसाहाय्य ; कागदपत्रे व इतर माहीती

करमाळा समाचार

कोरोनामुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांना चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रति विद्यार्थी दहा हजार रुपये शैक्षणिक शुल्क दिले जाणार असल्याबाबतचे पत्र जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय खोमणे यांनी दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोना मुळे आई अथवा वडील, दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी बालनिधी प्राप्त झालेला आहे. या निधीच्या पात्र लाभार्थ्यांनी लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील कोविड मुळे एक व दोन्ही पालक गमावलेल्या तीन ते 18 वयोगटातील प्रति बालकास शैक्षणिक शुल्क दहा हजार रुपये बालकाच्या शैक्षणिक शुल्कासाठी वितरित करण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे 30 जून पर्यंत प्रस्ताव सादर करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तर त्यानंतर येणाऱ्या सूचनांचा विचार केला जाणार नाही अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

अर्थसहाय्य मिळवण्याकरता अर्ज बालकांचे शाळेचे बोनाफाईड, आई वडील कोविड पॉझिटिव असल्याबाबतचा पुरावा झेरॉक्स प्रत, आई-वडील मृत्यू दाखला झेरॉक्स, प्रत ज्या शाळेत घेतला आहे त्या शाळेचे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत, बालकाचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत अशी कागदपत्रे बंधनकारक आहे.

संपर्क- मारुती ताटे
बाल संरक्षण अधिकारी करमाळा
+91 89994 68993

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE