E-Paperकरमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

मागील चार दिवसापासून मिसिंग असल्याल्या तरुणाचा मृतदेह बारवात सापडला

करमाळा समाचार

मागील चार ते पाच दिवसांपासून करमाळा पोलीस ठाण्यात हरवला असल्याची तक्रार दाखल असलेला 33 वर्षीय तरुणाचे मृतदेह किल्ला वेस येथील बारवात आढळून आले आहे. सदरची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढला. सदरचा मृत्यू हा बुडून झाल्याचं प्रथमदर्शी दिसून येत आहे.

अमोल बारकू आलाट (वय 33) रा. अण्णाभाऊ साठे नगर करमाळा असे त्या युवकाचे नाव असून मागील चार दिवसांपूर्वी करमाळा पोलीस ठाण्यात तो हरवला असल्याची तक्रार देण्यात आली होती. पोलीस त्याचा शोध घेत असतानाच त्याचा मृतदेह हा करमाळा शहरातील प्राचीन बारव म्हणून ओळख असलेल्या पण बऱ्याच दिवसापासून स्वच्छता न झालेल्या किल्ला वेस येथील बारवात आढळून आला आहे.

मागील तीन ते चार दिवसापासून सदरचा मृतदेह हा पाण्यात असल्याने तो फुगून वर आला होता. तर त्याची दुर्गंधी सर्वत्र सुटलेली होती. त्यामुळे परिसरातील महिलांना ही माहिती मिळाली त्यांनी पोलीस ठाण्याला कळवले व त्यावरून पोलीस त्या ठिकाणी आले व मृतदेह बाहेर काढून विच्छेदनासाठी पाठवला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE