E-Paperकरमाळा

टाकळी येथून वृध्द महिला बेपत्ता ; दिसल्यास संबंधित क्रमांकावर संपर्क साधावा

प्रतिनिधी – दिलीप दंगाणे

तालुक्यातील पश्चिम भागातील टाकळी येथून एक वृध्द महिला बेपत्ता झाली आहे . रतन माणिक नवले (वय -80) असे त्या वृध्द महिलेचे नाव आहे. सदर महिला ही दिनाक 11/10/2022 रोजी दुपारी 1 च्या सुमारास टाकळी येथील राहत्या घरातुन कोणालाही काहीही न सागंता निघून गेली आहे. याबाबत करमाळा पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

पाच फुट उंच, रंग ,गोरा, लाल रंगाची साडी व डोक्यावर पदर घेतलेली व अंगात चोळी घातलेली तसेच एका हातात काठी व दुस-या हाताच्या काखोटीला साडी चोळी घेतलेली वृध्द महिला हरवली आहे.

सदरची वृध्द महिला कोणाला दिसल्यास वा आढळून आल्यास करमाळा पोलिसांत संपर्क करावा अथवा नातेवाईक श्री सुभाष नवले रा.टाकळी मो.न.9405868788/8668654290 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन हवालदार श्रीकांत हराळे यांनी केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE