E-Paperआध्यात्मिक

स्व. फाळके यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने विविध उपक्रम

समाचार टीम

आज दिनांक 13  रोजी स्व. कै. विनायक दगडू फाळके यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त ह. भ. प. छगन खडके महाराज (प्रति इंदोरीकर) यांचे फुलाचे किर्तन संपन्न झाले. तसेच स्व. कै. विनायक दगडू फाळके यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त जि प प्रा शाळा पोमलवाडी यास स्व विनायक दगडु फाळके यांचा पुण्य स्मरणार्थ व्यासपीठ ( Dias) सप्रेम भेट व भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास स्वस्फुर्तीने लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

यावेळी 60 हून अधिक लोकांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरास श्री. भगवंत ब्लड बँक सेंटर, बार्शीचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे, विजय तोडकरी, सुयोग निकम, राधिका बेले, प्रणाली घोंगाणे ,यांनी यशस्वीरीत्या रक्तसंकलन केले . हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यात डी. सी. सी. बँक मॅनेजर श्री. राजेंद्र रणशिंग ,सो. उपजिल्हा शिवसेना प्रमुख सुर्यकांत पाटील, केत्तूरचे माजी सरपंच अड. अजित विघ्ने, सुहास एकाड, संग्राम पाटील,दत्ता काळे, संभाजी भोपते, श्री पोपट फाळके, श्री दत्ता काटे व गौळवाडी, पोमलवाडी , खातगाव ग्रामस्थांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE