करमाळासोलापूर जिल्हा

गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये फेस्टीवलचे आयोजन ; दीड लाखची उलाढाल

करमाळा समाचार

गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये दिनांक १६-१२-२०२२ व १७-१२-२०२२ या दोन दिवसात करमाळकरांसाठी प्रदर्शनाची व देखाव्याची मेजवानीच ,अशा गुरुकुल फेस्टिवल चे आयोजन हे फेस्टिवल अतिशय उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आले.

या कार्यक्रमाचे उदघाटन करमाळा शहराचे तहसीलदार मा. श्री. समीर माने साहेब तसेच प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे बी. डी. ओ मा. श्री मनोज राऊत साहेब, व यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री गणेशभाऊ करे पाटील, श्री. दिलीप तिजोरे सहाय्यक निबंधक करमाळा,डॉ. मोटे सर व श्री. झिझाडे सर यांची उपस्थिती लाभली.राऊत सरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन केले.

भाऊंनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून शाब्बासकीची थाप दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान विषयाची आवड निर्माण करून त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोण जोपासण्यात गुरुकुल यशस्वी ठरले. या फेस्टिवल मध्ये 1195 र्विद्यार्थ्याचा सहभाग होता. विविध प्रकारच्या प्रयोगांचे अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण करण्यात आले पहायला आलेला पालक वर्ग थक्क होऊन विद्यार्थ्यांचे प्रयोग पाहत होते व भरभरून कौतुक करत होते.

तसेच या फेस्टिवल मध्ये भाजी मंडई चा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचे धडे मिळाले.या भाजी मंडईला पालकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी ६५५८०रुपयांची आर्थिक उलाढाल झाली तर दुसऱ्या दिवशी ७५६९० रुपयांची आर्थिक उलाढाल झाली तसेच विविध राज्याच्या खाद्य पदार्थांचा आस्वाद पालकांनी या फेस्टिवल मध्ये घेण्यास मिळाला.फास्टफूडचा फूडस्टॉल मध्ये समावेश नव्हता. आरोग्यच्या दृष्टीने रुचकर पदार्थांचा समावेश होता. या फेस्टिवल मधील महत्त्वचे आकर्षण म्हणजे समुद्री जलजीवन व भारतीय संस्कृतीचा जिवंत देखावा.

या देखाव्यात इयत्ता चौथी च्या इतिहासापासून म्हणजे आदिमानव ते बुद्धिमान मानवाची निर्मिती, त्यावेळेस चे ग्रामीण जीवन, संतांची परंपरा, शिवाजी महाराजांचा इतिहास, समाजसुधारक व आताची मिसाईल निर्मिती आधुनिकता असा जिवंत देखावा पहायला मिळाला तो देखावा करमाळकरांचा चर्चेचा विषय बनला आहे. गुरुकुल मधील अशा नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे विदयार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होण्यास मदत मिळते. ही नविन्याची परंपरा नेहमी चालूच राहणार आहे. यासाठी संस्थेचे संस्थापक मा. श्री. नितीन भोगे सर व संस्थापिका सौ. रेश्मा भोगे यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम उत्तम रित्या पार पाडण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे परिश्रम व टिमवर्क यामुळे कार्यक्रम यशस्वी पार पडला.

सर्व शिक्षकांचे मनःपूवक आभार. पालकांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले त्यामुळे विदयार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले. करमाळा तालुक्यातील विविध शाळांनी या फेस्टिवल च्या निमित्ताने शाळेला भेट दिली. पालकांच्या, विविध शाळांच्या प्रतिसादामुळे शाळा त्यांची नेहमीच आभारी आहे. भविष्यात देखिल विदयार्थ्यांच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना असाच प्रतिसाद मिळावा हिच इच्छा संस्थापक भोगे यांनी व्यक्त केले .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE