एस .बी.ग्राफिक्सच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मुकबधीर शाळेस सीलिंग फॅन भेट
करमाळा:
करमाळा शहरातील व तालुक्यातील एस.बी.ग्राफिक्स या दुकानाच्या दोन वर्षपूर्ती निमित्ताने व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री देवीचा माळ येथील मूकबधीर शाळेस सिलिंग फॅन भेट दिली.
एस.बी.ग्राफिक्सचे मालक चि.संकेत सूर्यकांत भोसले यांनी एस. बी. ग्राफिक्स च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वायफळ खर्च न करता गरजू शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व मुकबधीर शाळेसाठी दोन सीलिंग फॅन भेट देऊन शिवजयंती व वर्धापन दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. याचे करमाळा परिसरातून व शहरातून कौतुक केले जात आहे. यावेळी मूकबधीर शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय काळे सर व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.


यावेळी मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय काळे सर, ॲड. आकाश मंगवडे व चि. संकेत भोसले यांनी आपल्या भाषणाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मूकबधिर शाळा व व्यवस्थापन समिती, अभि लावंड, यश भुजबळ, ओम कदम, अमित भास्करे, ओंकार मुसळे, सुमित पवार, ओम वाघमोडे, धीरज राऊत, वरद वांगडे, धनंजय पुराणिक आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. गणेश सातपुते सर यांनी केले.