कोंढेजचे सुपुत्राचा भीम पराक्रम ; पुणे ग्रामीण पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा
करमाळा समाचार
पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेले उपनिरीक्षक शिवाजी ननवरे मुळ गावं मु पो कोंढेज ता करमाळा जि सोलापूर यांनी दिनांक 17 मे 2023 रोजी सकाळी साडेअकरा वाजता जगातील सर्वात उंच ठिकाणी माउंट एवरेस्ट येथे महाराष्ट्र पोलीस तसेच पुणे ग्रामीण पोलीसचा झेंडा रोऊन पुणे ग्रामीण पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

शिवाजी ननवरे हे महाराष्ट्र पोलीस मधून चौथे एवरेस्ट वीर (पाहिले s IPS सुहेल शर्मा सर दुसरे पो हवा. रफिक शेख छ संभाजीनगर , तिसरे सपोनी .श्री. संभाजी गुरव पुणे शहर) असून पुणे ग्रामीण पोलीस चे पाहिले एवरेस्ट वीर आहेत.

शिवाजी ननवरे म्हणाले की, माऊंट एव्हरेस्ट शिखर हे चढाईस अत्यंत खडतर म्हणले जाते. पण हार मानेल तो माणूस कसला. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शिवाजी ननवरे यांनी बुधवारी दिनांक 17 मे 2023 रोजी माऊंट एव्हरेस्ट शिखरावर भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा फडकविला.
याबाबत बोलताना शिवाजी ननवरे सांगीतले की, माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी शारीरिक क्षमते बरोबरच मानसिक क्षमता देखील असणे आवश्यक आहे. उंच ठिकाणामुळे हवेतील तसेच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. त्यामुळे साधारण चालताना देखील शरीराची दमछाक होते, परंतु जिद्द आणि आत्मविश्वास असणारे ट्रेकर्सच नेहमी यशस्वी होतात.
माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. हिमालय पर्वतातील हे शिखर 8848.86 मीटर उंचीचे असून नेपाळ चीन सीमेवर स्थित आहे. नेपाळमध्ये नेपाळी मध्ये याला सागरमाथा तर तिबेट मध्ये याला चोमोलुंगा नावाने ओळखलं जात.