संशयीत आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी
करमाळा समाचार
नाशिक येथील श्रावण चव्हाण यांच्या खुना नंतर अटक करण्यात आलेल्या दोन भावंडांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास अधिकारी यांनी आज त्यांना न्यायालयात हजर केले होते त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

श्रावण रघुनाथ चव्हाण वय ४० रा. अडसुरेगाव ता. येवला जिल्हा नाशीक. असे मृत युवकाचे नाव आहे. तर सुनिल घाडगे व त्याचा भाऊ राहुल व वैशाली हे संशयीत आहेत. तर सुनिल व राहुल अटकेत आहेत.
