करमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा नगरपरिषदेच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीवर चोरांचा डल्ला ; शोध सुरु

करमाळा समाचार

करमाळा नगर परिषदेचा आरोग्य विभागातील कचरा उचलण्याच्या कामात येणारा जुना ट्रॅक्टर अज्ञात व्यक्तीने चोरून नेला आहे. सदरची घटना रविवारी मध्यरात्री घडल्याचे माहिती मिळत आहे. याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार पोलिसात दिलेली नसली तरी ट्रॅक्टरचा शोध नगरपालिकेचे कर्मचारी घेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे ट्रॅक्टर जरी जुना असला तरी त्याच्यासोबत एक नवीन ट्रॉली चोरटे घेऊन गेले आहेत.

काल रविवारी सर्व कर्मचारी स्वच्छतेची काम आटोपल्यानंतर माघारी जात असताना उपमुख्याधिकारी निवासस्थानासमोर लावलेले पाहुन गेले होते. यावेळी या ठिकाणी तीन ट्रॅक्टर होते. पण रात्री त्यातील एक ट्रॅक्टर चोरीला गेला सकाळी कर्मचाऱ्यांनी पाहिला असता नगरपरिषद अधिकाऱ्यांना ही माहीती दिली. यानंतर शोधाशोध सुरु आहे. थोड्या वेळानंतर पोलिसात तक्रार देणार असल्याची माहीती अधिकाऱ्यांनी दिली.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE