मोहल्ल्यात दिवसाढवळ्या चोरी करुन चोर फरार ; संशयीत सीसीटिव्हीत कैद
करमाळा समाचार
करमाळा शहरात मोहल्ला गल्लीमध्ये एका घरामध्ये अनोळखी दोन चोरटे घुसले. त्यांनी सोने-चांदी धुण्याच्या (स्वच्छ करण्याच्या) नावाखाली एका घरात घुसले. त्यानंतर महिला सोने धुण्यासाठी तयार झाल्यानंतर तिच्याकडील सोने घेऊन पसार झाल्याची घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. सदरचे संशयीत युवक सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाले आहेत.
सकाळी दहाच्या सुमारास मोहल्ला गल्ली येथे दोन अनोळखी व्यक्ती मोटरसायकलवर आले होते. त्यांनी आपण सोने धुवून देत असल्याचे माहिती सर्वत्र देत होते. एका घरात त्यांनी सोने धुण्याचा नावाखाली घरात घुसले. यावेळी एक महिला त्या घरात होती. सुरुवातीला चांदी स्वच्छ करून दिल्यानंतर सोने आणा म्हणून सांगितले पाणी गरम करत असताना सदरचे सोने महिलेने त्यांच्याकडे दिले. यावेळी महिलेला बनावट सोने देऊन चोरांनी पोबारा केला आहे.
सदर प्रकरणात महिलेच्या जवळील जवळपास दीड तोळे सोने चोरट्यांनी घेऊन पसार झाले आहेत. सदरची माहिती परिसरातील युवकांना कळताच युवकांनी शोध घेतला. परंतु ते मिळून आले नाहीत. यावेळी आसपासच्या सीसीटीव्हीत तपासणी केली असता दोन संशयित युवकांना एका सीसीटीव्हीत जाताना लक्षात आले आहे. त्यावरून पोलीस शोध घेत आहेत.