करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

छाननी दरम्यान आक्षेप तीन अर्ज अवैध ; तर सात उमेदवारी अर्ज घटले

करमाळा समाचार

तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतीच्या (karmala) निवडणुकीमध्ये छाननी दरम्यान दहा ते बारा उमेदवारांवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामध्ये जेऊरसह इतर गावांचा समावेश होता. यावेळी या सर्व प्रकरणावर सुनावणी होऊन त्यातील तीन अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये गौंडरे येथील दोन तर जेऊर (जेउर) येथील एका अर्जाचा समावेश आहे. आता तालुक्यातून १६ ग्रामपंचायत साठी ६३२ सदस्य तर ११० सरपंच अर्ज शिल्लक राहिले आहेत. माघार घेण्याच्या दिवशी दि २५ ला संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

आक्षेप घेण्यात आलेल्या गौंडरे येथील हनुमंत अंबारे यांचे वय कमी असल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. तर राजूबाई नलबे यांचा विकल्पानुसार बाद करण्यात आला आहे. त्यांचा एक अर्ज अजूनही शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. तर जेऊर येथील तीन अपत्य असल्यामुळे बाळासाहेब खेळकर यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे.

सदस्य पदासाठी प्राप्त अर्ज- कावळवाडी -१८, रामवाडी-१८, भगतवाडी-२१, राजुरी ३३, उंदरगाव-१४, चिखलठाण-३९, गौंडरे-३४, कंदर-६२, कोर्टी -४७, निंभोरे-३९, केत्तुर-४४, वीट-६३, घोटी-५७, रावगाव-४९, केम-४५, जेऊर-४९ एकूण-६३२

तर सरपंच पदासाठी –
कावळवाडी – ४, रामवाडी-८, भगतवाडी-४, राजुरी-८, उंदरगाव-९, चिखलठाण-४, गौंडरे-८, कंदर-७, कोर्टी -१०, निंभोरे- ९, केत्तुर-१२, वीट-८, घोटी-५, रावगाव-५, केम-२, जेऊर-७,
एकूण ११० अर्ज दाखल झाले आहेत.

 

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE