सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रमुखाचा ताफा अडवला ; आश्वासनानंतर गाड्या सोडल्या
करमाळा समाचार
सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी गावात सावडी गावात पुढाऱ्यांना बंदी केली होती. गावातून दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा ताफा जात असताना मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी हा वाहनांचा ताफा अडवल्यानंतर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मराठा समाजाच्या भावना थेट मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवू पर्यंत पोहोचवू व मराठा आरक्षणाला आमच्या सर्व शिवसैनिकांचा पाठिंबा आहे असे जाहीर केले असा शब्द दिल्यानंतर दिल्यानंतर सर्व गाड्या पुढे सोडण्यात आल्या.
यावेळी अभिमान देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन गेली पन्नास वर्षांपासून मराठा समाजावर झालेला अन्याय दूर करावा दूर करावा व आमचा एकनाथ शिंदे साहेबावर विश्वास आहे असे सांगून लवकरच निर्णय घ्यावा असे आवाहन केले.
करमाळा तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून मराठा आरक्षणा ला पाठिंबा देण्यासाठी गावोगावी पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केलेली असताना आज हजारोंच्या संख्येने दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत होते. यावेळी पुढाऱ्याना गावबंदी असल्यामुळे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष महेश चिवटे यांच्यासह इतर गाड्या अडवल्या होत्या. त्यानंतर शेवटी यांनी सदरचे आश्वासन दिले आहे. त्यावेळी संबंधित गाड्या पुढे सोडण्यात आल्या.