गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना भोजन
करमाळा –
भाजपाचे जिल्हा सरचिटणीस, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त चिवटे मित्र परिवाराकडून एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा येथील निवासी विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले.

चिवटे हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवितात. वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना भोजन दिले गेले. आगामी काळात आश्रमशाळेस सहकार्य करु. असे चिवटे यांनी सांगितले.
