आता तुम्हीच निर्णय घ्या .. आदिनाथवर सभासदांना उपस्थीत राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी वाशिंबे
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी सर्व सभासद ऊस उत्पादक शेतकरी यांनी दि.१३ बुधवार रोजी कारखाना स्थळावर १०,३० मि.उपस्थित रहावे असे आवाहन आदिनाथ सल्लागार समितीचे सदस्य हरिदास डांगे यांनी केले आहे.
डांगे यांनी बोलताना सांगितले कारखाना सुरू होऊन ही तोट्यात आहे.त्यामुळे कारखान्याचे प्रचंड अर्थिक नुकसान होत आहे.प्रशासकांकडून पाच सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे.यामध्ये माझी स्वताची ही नियुक्ती करण्यात आली आहे.परंतू ऐन वेळी सल्लागारांची नियुक्ती करुन कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी रीत्या होईल असे वाटत नाही. त्यामुळे शेतकरी व सभासदांनी विचार मंथन करून पुढील दिशा व निवडणूकीबाबत बैठकीत ठोस निर्णय घ्यावा असे मत डांगे यांनी व्यक्त केले.