करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

रिटेवाडीसह इतर कामांसाठी प्रयत्न करुन कायम सहकार्य करणार

करमाळा समाचार

रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी प्रयत्न चालू आहेत, भगीरथ योजनेची डीपी मंजूर करून देऊ तसेच वीट परिसरात विकास कामांसाठी कायम सहकार्य राहील असे आश्वासन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे करमाळा दौऱ्यावर आले असता त्यांनी विट येथे जगदीश निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी वीट ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित उपसरपंच व सदस्यांचा सत्कार केला. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच प्रतिनिधी अंकुश जाधव ग्रामपंचायत सदस्य जगदीश निंबाळकर गणेश ढेरे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, राजेंद्र निंबाळकर, भाऊसाहेब मेहेर, सतीश निंबाळकर, हर्षद गाडे, संजय निंबाळकर, भाऊसाहेब जाधव, हरिभाऊ आवटे, विश्वनाथ ढेरे, रणजीत निंबाळकर, अंगद ढेरे, भाऊसाहेब पुजारी, हनुमंत जाधव, ओंकार निंबाळकर, नागनाथ आवटे आदी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE