मंगल कार्यालया बाहेर उभा असलेल्या गाडीतुन पर्स पळवली ; लाखाचा मुद्देमाल गुन्हा दाखल
करमाळा समाचार
येथील नालबंद मंगल कार्यालय येथे लग्नासाठी आल्यानंतर एका महिलेची गाडीमध्ये ठेवलेली पर्स अज्ञात चोरट्यांकडून चोरून नेली आहे. त्यामध्ये एक लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे, सदरचा प्रकार रविवारी दि २८ दुपारी दीडच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी मोनिका वनवे वय ३९ रा. टिळेकर नगर कात्रज ता. हवेली जिल्हा पुणे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनवे कुटुंबीय हे पुणे येथे राहतात. ते करमाळा येथे लग्न असल्याने नालबंद मंगल कार्यालय येथे आले होते. यावेळी वॅगनर गाडी ( क्रमांक एम एच १२ एम एल ८०१२) घेऊन ते कार्यालयाबाहेर येऊन थांबले. त्यानंतर लग्नाला उशीर झाल्यानंतर घाईत ते आत मध्ये पोहोचले. पण यावेळी त्यांची पर्स गाडीत राहिली होती व गाडीला लॉक करण्याचेही राहून गेले. यावेळी माघारी आल्यानंतर पहिले असता गाडीतील बॅग अनोळखी चोरट्याने पळून नेली होती.

त्यामध्ये दोन तोळे सोन्याचे गंठण एक लाख रुपये व दहा हजार रुपये रोख रक्कम तसेच एक सहा हजाराचा मोबाईल असा एकूण एक लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. सदर घटनेचा पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहे.