करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात पोलिसांचा रुट मार्च ; चार अधिकाऱ्यांसह ३५ पोलिस सहभागी

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात शांतता प्रस्थापित व्हावी सामान्य जनतेला सुरक्षित भावना निर्माण व्हावी यासाठी दि ६ रोजी गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्ताने रूट मार्च घेण्यात आला. यावेळी चार पोलीस अधिकारी व 35 पोलीस अंमलदार उपस्थित होते.

महाराष्ट्रात धार्मिक वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु करमाळा शहर व तालुका सर्वधर्मसमभाव या पद्धतीने आतापर्यंत वागत आलेला आहे. तरीही महाराष्ट्रात कुठे ना कुठे दूषित वातावरण होत चालले आहे. त्या अनुषंगाने करमाळ्यातही सामान्य लोक सुरक्षित असल्याची भावना उत्पन्न व्हावी म्हणून करमाळा पोलीस ठाणे यांच्या वतीने रूट मार्च घेण्यात आला.

करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलिस निरिक्षक पोपट टिळेकर, पोलिस उपनिरिक्षक विनायक माहुरकर, संदेश चंदनशिव यांच्यासह इतर पोलिस सहभागी झाले होते.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE