करमाळाराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर शहर

जगताप पाटील यांच्या सभेची तयारी पुर्ण ; जगतापांची तोफ धडाडणार

करमाळा समाचार

करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात पाटील व जगताप मनोमिलनासाठी आयोजित सभा करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात दुपारी दोन वाजता सुरू होत आहे. यासाठी मंडप उभारण्यात आला असून परिसरातील लोकांनी सदर ठिकाणी येण्यासाठी सुरुवात केली आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी माजी आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप यांची तोफ धडाडणार आहे.

तालुक्यात राजकीय भूकंप नुकताच घडलेला आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी नारायण पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर सदरची सभा पहिलीच असून या सभेमध्ये नेमके काय घडले व कशामुळे पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जगताप यांनी घेतला या मुद्द्यांसह जगतापांची नेमकी नाराजी काय या सर्व प्रश्नांचा उलगडा आज या सभेत होताना दिसणार आहे.

माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पाठिंब्यामुळे गतवर्षी संजय मामा शिंदे हे अवघ्या पाच हजार मतांच्या फरकाने विधानसभेवर निवडून आले होते. पण आता चित्र बदलताना दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत संजय मामा शिंदे यांना राम राम करीत जगताप यांनी थेट पाटील यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याने पाटील यांची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे. आत्तापासूनच गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणावर मोठी सभा होईल असे दिसून येत आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE