करमाळ्यात तुरीच्या क्षेत्रात तिपटीने वाढ ; पाणी फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश
करमाळा समाचार
करमाळा तालुक्याचे सरासरी ५६७५ हेक्टर एवढेच तुरीचे क्षेत्र होते. गेल्या तीन वर्षात पाणी फाउंडेशन शेतकऱ्यांसाठी फार्मर कप ही स्पर्धा राबवली या स्पर्धेच्या अंतर्गत शेतकऱ्याला गट शेती करण्यास प्रवृत्त करण्यात आले. तुर पिकाच्या मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रातील तुर पिकातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात आले त्यामुळे आता तालुक्यातील क्षेत्र वाढले असुन यंदा १४३२४ हेक्टर वर तुर लागवड करण्यात आली आही.
करमाळा तालुका शेतकरी तुरीच्या, तूर पीक मुख्य पीक झाले आहे. याठिकाणी पाणी फाऊनडेशनने मुख्य भुमिका बजावली आहे. तर शास्त्रज्ञांनी सुद्धा तूर पिकातील सुधारित पद्धती पूर्व मशागती पासून तर काढणीपर्यंतची मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.
त्याचाच परिणाम करमाळा तालुक्यामध्ये तुरीचे उत्पन्नात प्रचंड वाढ झाली आहे. यावर्षी करमाळा तालुक्यामध्ये तुरीच्या क्षेत्रामध्ये १४३२४ हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड झाली आहे. तुरीच्या लागवडीतून शेतकऱ्याला सरासरी १२ क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळत आहे. प्रथमच विद्यापीठाने तयार केलेल्या गोदावरी मानाची निवड शेतकऱ्यांनी केली तुरीची डाळ ही खाण्यासाठी चविष्ट असल्याने या तुरीला प्रचंड मागणी आहे. शेतकरी गटांनी एकत्रित तुर पिकल्यामुळे व्यापारी शेतकरी गटांच्या संपर्कात येऊन तूर खरेदी करत आहेत. पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला आहे.
२३-२४ -१३५०० हेक्टर
२२ – २३ – ७०६१ हेक्टर
सरासरी क्षेत्र – ५६७५.८० हेक्टर इतके आहे.
पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धे अंतर्गत गावामध्ये ११ शेतकऱ्यांचा गट तयार केला. शेतकऱ्यांनी एकत्रित निविष्ठांची खरेदी केली त्यामुळे पैशाची बचत झाली, शेतीची कामे इर्जीक पद्धतीने केली त्यामुळे मजुरीच्या पैशात बचत झाली. त्यामुळे गटातील शेतकऱ्याच्या उत्पादन कमी झाला आणि
शेतकऱ्यांना विद्यापीठातील नामांकित शास्त्रज्ञ ऑनलाईन शेती शाळेच्या माध्यमातून जोडून दिले त्यामुळे तूर पिक घेत असताना आलेल्या अडचणी शास्त्रज्ञांच्या मदतीने सोडवण्यात आल्या.
त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमालीची वाढ झाली.
– प्रतीक गुरव
तालुका समन्वयक करमाळा.
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करण्याचा निर्धार केला.शेती करण्याची दिशा बदलली. त्याचाच परिणाम तालुक्यात तुरीच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली मागील वर्षी सरासरी ५ ते ७ क्विंटल उत्पन्न निघत होते या दोन तीन वर्षात तुरीचे उत्पन्न सरासरी १२ क्विंटल पर्यंत आले आहे.
त्यांनी स्वतःमध्ये बदल केलाय त्यामुळे हा ऐतिहासिक बदल करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी घडवून आणला आहे. शेतकऱ्यांचा अभिमान वाटतो.
– आशिष लाड
तालुका समन्वय करमाळा.