करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सालसे गाव व परिसरात होत असलेले गुन्हे थांबविणेसाठी बसविले सि सी टि व्ही कॅमेरे

करमाळा –

सालसे गाव हे करमाळा ते परांडा व कुर्डुवाडी या राज्य मार्गावर आहे. त्यामुळे सदर मार्गावर नेहमी अपघात होत होते व अपघातानंतर आरोपी वाहनचालक गाडी सह फरार होत होते. तसेच सालसे परीसरात घरफोडी, चोरी , महिलांची छेडछाड करणे याबतचे गुन्हे वाढले होते. त्यामूळे करमाळा पोलीस स्टेशन यांनी यापूर्वी गट विकास अधिकारी करमाळा व ग्रामपंचायत सलसे यांना पत्र देवून सालसे चौकात कॅमेरे बसविनेसाठी विनंती केली होती. त्याला ग्रामपंचायत सालसे यांनी प्रतिसाद देवून एक लाख रुपये खर्च करून गावचे चौकात व शाळेत 08 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

त्यामुळे आज रोजी करमाळा पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक श्री विनोद घुगे साहेब, गट विकास अधिकारी श्री कदम साहेब , Api श्री रोहीत शिंदे,Psi श्री संदेश चंदनशिव पो हवा नाईकनवरे,पो शि संदीप शिंदे यांनी भेट देवून आभार व्यक्त केले यावेळी गावचे उद्योजक दशरथ घाडगे , सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक असे उपस्थीत होते.

सालसे ग्रामपंचायत प्रमाणेच करमाळा तालुक्यातील इतर ग्रामपंचायत यांनी देखील आपले गावचे हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE