करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा जातेगाव रस्त्यावर वारकऱ्यांच्या गाडीचा भिषण अपघात ; जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले

करमाळा समाचार

वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या पिकपचा तसेच स्थानिक गाडीतून माशांसाठी खाद्य घेऊन जाणाऱ्या पिकपचा समोरासमोर अपघात झाल्याने आठ ते दहा वारकरी गंभीर जखमी झाले असून त्यांना करमाळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरची घटना जातेगाव रस्त्यावर कामोणे फाटा परिसरात घडले आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन व स्थानिकांच्या मदतीने करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमींना तात्काळ पाठवले. त्यांच्यावर करमाळा येथे उपचार सुरू आहेत.

politics

सदरचा अपघात इतका भीषण होता की परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली व तात्काळ पोलिसांना व ॲम्बुलन्सला कळवले. यावेळी पिकअप मधील दहा ते बारा जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस आनंद पवार, मयूर कदम, श्री गव्हाणे आदींच्या पथकाने भेट दिली. तर ॲम्बुलन्स च्या माध्यमातून जखमींना करमाळा पाठवण्यात आले आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE