मनोहर भोसलेला पोलिसांकडून पुण्यात अटक ; सोलापूर पोलिसांची कारवाई
करमाळा समाचार

आर्थिक फसवणूक केल्याबद्दल करमाळ्याचे मनोहर भोसले यांना कुर्डवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सोलापूर पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरण अटक झाल्यानंतर उघडकीस आले आहे. यापूर्वीही त्यांच्यावर एका महिलेने अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या सुरू असलेल्या भोंदूगी्रीच्या प्रकरणांमुळे या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. पुढे पोलीस व सरकार कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे.

करमाळा तालुक्यात बाळूमामाच्या नावाने धार्मिक विधी व माहिती देण्यासाठी चर्चेत आलेले मनोहर भोसले यांनी सुरुवातीला उंदरगाव येथे आपले प्रस्थ वाढवले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर त्या ठिकाणी अत्याचाराचा गुन्हा व गावातील मंडळींकडून विरोध होऊ लागल्यानंतर त्यांनी आपले प्रस्थान घोटी परिसरात हलवले व त्या ठिकाणी स्थापना केली. तेव्हापासून मनोहर भोसले यांच्या चर्चा थांबल्या होत्या.
परंतु नुकतेच खरात प्रकरण घडले व कुर्डवाडी भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मनोहर भोसले यांचा तपास करून तात्काळ अटक केली आहे. यामुळे पुन्हा एकदा जुन्या विषयांना तोंड फुटले असून यामध्ये काही भोंदूगिरी चा प्रकार आहे का? व त्याचा पुढील तपास कुर्डूवाडी पोलीस कोणत्या दिशेने करतील हे अजून गुलदस्त्यात असून येणाऱ्या काळात मनोहर भोसले यांच्यावर कोणते कलम टाकले जातील हे स्पष्ट झाले नाही. तूर्तास त्यांना अटक झालेली माहिती मिळत आहे.


