अधिकाऱ्याच्या प्रबोधनाने बदलली दिशा ; पैलवानऐवजी झाला अधिकारी
करमाळा – विशाल घोलप
एकदा गावात एमपीएससी पास झालेले अधिकारी येऊन गेले आणि त्यांनी गावकऱ्यांना स्पर्धा परिक्षांची माहीती दिली. यावेळी महेश तोरमल (कुंभेज) यांच्या वडिलांच्या मनात सदरच्या नोकरीबाबत उत्सुकता निर्माण झाली. त्यातूनच पैलवानगकी करण्याची इच्छा ठेवणाऱ्या वडिलांनी आपल्या मुलाला अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितल. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलाने प्रयत्न करीत पहिल्याच परिणाम एसटीआय व पीएसआय अशा दोन परीक्षा पास करणे कुंभेज सारख्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत शिकून मोठी भरारी घेतली आहे.
महेश बबन तोरमल असे त्या युवकाचे नाव आहे. क्रिकेट सारख्या खेळात जिल्ह्यात नाव कमवणारा हा गुणी खेळाडू आज नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला तो एक अधिकारी जो गावात येऊन पदवी नंतर मुलांनी स्पर्धा परीक्षा कडे वळले पाहिजे हे सुचवले. तेव्हापासून महेशच्या पैलवान शेतकरी वडिलांच्या डोक्यात मुलाबाबत वेगळ्या अपेक्षा निर्माण झाल्या. त्यांनी मुलास अधिकारी करण्याचे ठरवले.
तालुक्यातील कुंभेज सारख्या छोट्या गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये महेश पहिली ते सातवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जेऊर येथील विद्यालयात आठवी ते दहावी शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी त्यांनी अकलूज गाठले. त्यानंतर पुणे येथील कृषी महाविद्यालयातून पदवी प्राप्त करीत २०२० मध्ये स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन नसताना शिवाय ट्युशनही लावली नाही. स्वतःच्या पद्धतीने अभ्यास करून व मित्रांच्या बरोबरीने स्पर्धा करीत महेश पहिल्याच प्रयत्नात दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये एस टी आय परीक्षेचा निकाल काही दिवसापूर्वीच लागला तर बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या पीएसआय या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. एकाच वेळी दोन परीक्षा पास होऊन त्यांनी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याची यापूर्वी केलेला आहे.
सुरुवातीला वडिलांची इच्छा पैलवान व्हावी अशीच होती. परंतु नंतर त्यांनी अधिकाऱ्यांचे बोलणे ऐकल्यावर सदरचा प्रवास जमेल का असे विचारले. त्यावेळी मी तात्काळ हो म्हणले. तेव्हापासून वडिलांनी मला पूर्ण सहकार्य केले व आज दोन्ही परीक्षा पास झाल्यानंतर त्यांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद होत आहे. सध्या दोन्ही परिक्षा पास झालो आहे पण अजुन नेमके कोणत्या खात्याकडे जायचे हे अद्याप ठरवले नसले तरी कुटुंब आनंदी आहे.
– महेश तोरमल, उत्तीर्ण