पत्रकारांच्या मुस्कटदाबी विरोधात पत्रकारदिनी काळी फित लाऊन मुक आंदोलन
करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणूक निषेधार्थ पत्रकार दिना दिवशी करमाळा तहसील कार्यालयासमोर पत्रकार संघटनेने काळे फिती तोंडाला लावून मुक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकारांच्या वतीने देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की करमाळा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी त्यांच्या दालनात पत्रकारांनी आंदोलनकर्त्याना फिरवले व विरोधात आंदोलन करण्यास भाग पाडले असे म्हणत थेट आरोप करीत अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेच्या निषेधार्थ पत्रकार दिनाच्या दिवशी करमाळा शहर तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार करमाळा येथील तहसील कार्यालयाच्या आवारात काळ्या फिती तोंडाला लावून सदर घटनेचा निषेध करणार आहेत.
सदर आंदोलनामध्ये करमाळा शहर तालुक्यातील पत्रकार बांधवांनी अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकारांनी केले आहे. याबाबत पत्रकार बांधवांनी करमाळा पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमती अंजना कृष्णा यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. तसेच सविस्तर माहिती देऊन घटने कडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली आहे.


