करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

जिल्हा ग्राहक संरक्षण समितीवर माधुरी परदेशी व ॲड. नरोटे यांची निवड

करमाळा समाचार

जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर पुरवठा शाखा तर्फे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद गठित करण्यात आली. या समितीत जिल्हा ग्राहक संरक्षण प्रतिनिधी अशासकीय सदस्य म्हणून एकुण १९ जणांची निवड करण्यात आली. त्या मध्ये करमाळा तालुकातील सौ.माधुरी राजेंद्र परदेशी व श्री एडवोकेट प्राध्यापक शशिकांत नरोटे यांची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.

या परिषदेंतर्गत एकूण ४२ सदस्य नियुक्त करण्यात आले असून जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी, नगर परिषदेचे प्रतिनिधी, महानगरपालिका प्रतिनिधी, पंचायत समिती प्रतिनिधी, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी, ग्राहक संघटना प्रतिनिधी, शाळा महाविद्यालय प्रतिनिधी, वैद्यकीय व्यावसायिक संस्था प्रतिनिधी, व्यापारी व उद्योग संघ प्रतिनिधी, तसेच पेट्रोल गॅस विक्रेते व शेतकरी प्रतिनिधी चा समावेश आहे.

प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम (भा. प्र. से )यांच्या सहीने आदेश जारी करण्यात आला आहे. या समितीमध्ये असणारे अशासकीय सदस्य तीन वर्ष किंवा नवीन सदस्य नेमले जात नाही तोपर्यंत कार्यरत राहतील. या निवडी बद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष श्री बाळासाहेब औटी व प्रांत सहसचिव श्री दीपक इरकल व सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री शशिकांत हरिदास यांनी अभिनंदन केले. करमाळा तालुका अद्यक्ष व सगळ्या सदस्यानी अभिनंदन केले.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE