नव्या बस आल्या आता सुसूत्रता आणण्यासाठी देखरेख समितीची गरज
करमाळा समाचार

आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून करमाळा व कुर्डुवाडी आगारांसाठी प्रत्येकी पाच नवीन बस मंजुर झाल्या आहेत. सदरच्या बस प्रत्यक्ष करमाळा आगारात या बसेस दाखल झाल्या आहेत. यावेळी या नवीन लालपरींच स्वागत आमदार नारायण आबा पाटील यांनी केले. समाज माध्यमातून आवाज उठवल्याबद्दल मान्यवरांसह विशाल घोलप यांना उदघाट्नाचा मान देण्यात आला. तर पुढे ही लोकांना प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून व्यवस्थापन समितीची गरज असल्याचे दिसून आले.

यावेळी नगरसेवक संजय सावंत, आदिनाथ संचालक देवानंद बागल, संचालक आबासाहेब अंबारे, पंचायत समिती सदस्य स्वप्नील काळे, बाजार समिती सदस्य बाळासाहेब पवार, आदिनाथ युवा संचालक रविकिरण फुके, आदिनाथ माजी संचालक विठ्ठलभाऊ शिंदे, पंचायत समिती माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, पंचायत समिती माजी सदस्य जयराम सोरटे, तात्या काळे, लुनावत वकील, घोलप वकील, भिमरावं गाडगे, उमेश सरडे, शेतकरी नेते अण्णा सुपणावर, विनोद शिंदे, गौतम वारे, बाळासाहेब अडसूळ, रामलिंग देशमुख आदिसह मान्यवर उपस्थित होते.
करमाळा आगाराच्या वतीने आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे, स्थानक प्रमुख शिवाजी कानाडे, वाहतूक निरीक्षक पंकज जाधव यांनी आमदार नारायण आबा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार नारायण आबा पाटील यांनी म्हणाले की करमाळा व कुर्डुवाडी आगारांसाठी पहिल्या टप्प्यात दहा गाड्या मंजुर झाल्या आहेत तर आणखी एका महिन्यात दुसऱ्या टप्प्यात दहा नवीन गाड्या उपलब्ध होतील.

करमाळा आगारातील कर्मचारी रिक्त पदाबाबतही आपण परिवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेशी बोललो असुन त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली करमाळा व कुर्डुवाडी आगारातील प्रलंबित प्रश्न सुटतील याचा आम्हाला विश्वास आहे. करमाळा बसस्थानक नुतणीकरणासाठीही आपण यापुर्वी भरीव निधी मंजुर करुन आणला व हे काम पुर्णत्वास नेले. जेऊर नवीन बसस्थानक बांधकाम आता पुर्ण होत आले असून लवकरच हे बसस्थानक लोकसेवेसाठी सज्ज असेल. नागरिकांच्या दळणवळणाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.

