करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

विठ्ठल- रुक्मिणी, ज्ञानबा तुकाराम गजरात गावातून दिंडी ; पाडळी येथे बालदिंडीचा उपक्रम

करमाळा समाचार

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी तालुका करमाळा येथे बालदिंडीचा कार्यक्रम घेण्यात आला.दिंडीचे खास आकर्षण म्हणजे मुलींनी सादर केलेल्या गवळणी, भारूड, वारीतील गाणी
बालचमूमधील सुंदर दिसणारे विठ्ठल रुक्मिणी, ग्यानबा तुकारामांच्या गजरात गावातून दिंडी काढण्यात आली.

दिंडीमध्ये वापरण्यात आलेली पालखी टाकाऊ वस्तू पासून केली होती सर्व पालक , ग्रामस्थ, गावात आलेले वारकरी, महिला पालक सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमाला मिळाला.या कार्यक्रमासाठी पोथरे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ढाकणे साहेब यांनी भेट दिली.दिंडीचा कार्यक्रम पाहून समाधान व्यक्त केले तसेच सर्व शिक्षकांना शालेय कामकाजाबद्दल मार्गदर्शन केले.

पर्यावरण रक्षणासाठी दिंडीतील वारकऱ्यांना मुख्याध्यापिका मनीषा पेठकर यांच्या संकल्पनेतून सर्व विद्यार्थ्यांनी करंज,आंबा,चिंच या झाडांच्या दीड हजार बियांचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांनी या सर्व बिया दिंडी मार्गावर लावाव्यात व पर्यावरण रक्षण करावे .असे आवाहन करण्यात आले दिंडी चे स्वागत व वेशभूषा केलेल्या विठ्ठल रुक्मिणीचे औक्षण गावातील महिलांनी केले.

सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री चिंचकर सर,श्री सिरसट सर,श्री चव्हाण सर राणी क्षीरसागर मॅडम, भाग्यश्री टापरे मॅडम, मुख्याध्यापिका मनीषा पेठकर मॅडम यांनी परिश्रम घेतले.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE