करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

दिव्यांग मुलांसाठी अक्कलकोट येथे मोफत होमिओपॅथिक शिबिर; जिल्ह्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा : चेअरमन महेश इंगळे

करमाळा :

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट संचलित श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल व प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “Hope for Hopeless” या उपक्रमांतर्गत दिव्यांग मुलांसाठी मोफत होमिओपॅथिक तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.०० ते १२.०० या वेळेत श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भक्त निवास समोर, मंद्रगी रोड, अक्कलकोट येथे होणार असून, शिबिरासाठी प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अंबरीश विजयकर हे मार्गदर्शन व रुग्णांची तपासणी करणार आहेत.

या शिबिरामध्ये दिव्यांग मुलांसाठी विशेष, सुरक्षित, सोपे व परिणामकारक होमिओपॅथिक उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रेम, सेवा आणि आध्यात्मिक भावनेतून रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

श्री स्वामी समर्थ महाराज देवस्थान समितीचे चेअरमन श्री. महेश मालक इंगळे यांनी दिव्यांग मुलांच्या पालकांनी या मोफत शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

तसेच देवस्थानचे विश्वस्त संपतराव शिंदे-पाटील यांनी विशेषतः करमाळा तालुक्यातील दिव्यांग रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत या शिबिराची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही केले आहे.
या शिबिरामुळे अनेक दिव्यांग मुलांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन व उपचार मिळून त्यांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE