करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

18 वर्ष पूर्ण युवकांचा मतदार यादीत समावेश करा; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयात जाणार

करमाळा प्रतिनिधी


आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सन 2007 व 2008 मध्ये जन्मलेल्या तसेच निवडणूक प्रक्रियेपूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व पात्र युवक-युवतींचा अंतिम मतदार यादीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे करमाळा तालुका कार्याध्यक्ष श्री. सुजित शिवाजी बागल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी पात्र नागरिकांची नावे समाविष्ट करणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना देऊन कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्य निवडणूक आयुक्त, मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि तहसीलदार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. मागणीसह राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. यावेळी भरत भाऊ अवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष आशिष गायकवाड, देवळाली ते माजी सरपंच सुजित बागल, पोपट बोराडे, तुषार शिंदे, युवराज गपाट, सचिन नरसाळे, नवनाथ जगदाळे, माजी सरपंच हिसरे नानासाहेब निळ, प्रशांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य, विनय ननवरे माजी सरपंच बोरगाव, अजिंक्य पाटील तरडगाव, सतीश पाटील, पाडळी गणेश सरडे, सरपंच करंजे शहाजी झिंजाडे, पोथरे विलास दादा पाटील लव्हे आदी उपस्थित होते.

ad
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE