करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत एमआयटी च्या विश्वजीत साळुंके याचे उज्ज्वल यश!

करमाळा (प्रतिनिधी):

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत एमआयटी विश्वशांती गुरुकुल, पंढरपूर या शाळेचा इयत्ता ९ वी तील विद्यार्थी विश्वजीत अमरजीत साळुंके याने जलतरण (पोहण्याच्या) स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले आहे.

विश्वजीतने सोलापूर जिल्हास्तरावर आयोजित विविध वयोगटातील पोहण्याच्या शर्यतींमध्ये आपल्या कौशल्याच्या जोरावर
१७ वर्षांखालील वयोगट (१०० मीटर फ्री स्टाईल): प्रथम क्रमांक

१७ वर्षांखालील वयोगट (५० मीटर फ्री स्टाईल): द्वितीय क्रमांक९ वर्षांखालील मुलांच्या वॉटरपोलो प्रकारात: प्रथम क्रमांक मिळविला आहे.

विश्वजीतचे मूळ गाव सातोली (ता. करमाळा, जि. सोलापूर) असून त्याच्या या यशाबद्दल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, एमआयटी विश्वशांती गुरुकुल, पंढरपूरचे संस्थाचालक, मुख्याध्यापक गवळी, क्रीडा शिक्षक, साळुंके परिवार तसेच करमाळा व पंढरपूर परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पुढील महिन्यात होणाऱ्या विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी त्याला सर्वस्तरातून हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE