ज्ञानेश्वर वाचन मंदिरात वाचक व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी नवीन ग्रंथसंपदा
करमाळा :

करमाळा नगरपरिषदेच्या ज्ञानेश्वर वाचन मंदिरात वाचक तसेच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन पुस्तके व विविध विषयांवरील ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, युवक तसेच वाचनप्रेमी नागरिकांना अभ्यासासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

ज्ञानेश्वर वाचन मंदिरामध्ये स्पर्धा परीक्षा, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मराठी व इंग्रजी भाषा तसेच विविध संदर्भग्रंथांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य विभाग, शिक्षक भरती आदी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या ग्रंथसंपदेचा लाभ घेता येणार आहे.
वाचनाची आवड वाढावी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्याससाहित्य सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वाचन मंदिरामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नवीन ग्रंथांच्या उपलब्धतेमुळे वाचन मंदिरात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाचक व विद्यार्थ्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रंथालय सेवक दत्ता घोलप हे वाचकांना आवश्यक पुस्तके व ग्रंथ उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करीत आहेत.
ज्ञानेश्वर वाचन मंदिरात नवीन ग्रंथ उपलब्ध
करमाळा : करमाळा नगरपरिषदेच्या ज्ञानेश्वर वाचन मंदिरात वाचक तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरील नवीन पुस्तके व संदर्भग्रंथ उपलब्ध करण्यात आले आहेत. यामध्ये स्पर्धा परीक्षा, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी तसेच विविध संदर्भग्रंथांचा समावेश आहे. या नवीन ग्रंथसंपदेचा लाभविद्यार्थ्यांसह वाचनप्रेमी नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
– दत्ता घोलप, ग्रंथालय सेवक, ज्ञानेश्वर वाचन मंदिर, करमाळा


