करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

AI Campus, Data Center आणि Green Hydrogen प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर : शिष्टमंडळ खा. पवार यांच्या भेटीला

करमाळा समाचार

उजनी धरण जलाशय परिसरात प्रस्तावित AI Campus, Data Center आणि Green Hydrogen प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर बारामती येथे खा.शरद पवार साहेबांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व उजनी धरण परिसरातील इंदापूर माढा व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांच्या शिष्टमंडळासह भेट घेतली

यावेळी प्रस्तावित प्रकल्पासाठी होणारा पाणी वापर, शीतकरणासाठी लागणारे पाणी, पाण्याचा पुनर्वापर, Floating Solar मुळे होणारी पाणीबचत तसेच दुष्काळी परिस्थितीत प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्याचे निकष याबाबत सविस्तर माहिती शरद पवार साहेबांना देण्यात आली.

उजनी जलाशयावर सोलापूर जिल्ह्यासह अनेक भागातील पिण्याचे पाणी, शेती, सिंचन, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक उपजीविका अवलंबून आहेत.त्यामुळे उजनीच्या विद्यमान लाभार्थ्यांच्या पाण्याच्या हक्काला कोणताही धक्का न लावता, भविष्यातील पाण्याची गरज आणि दुष्काळी परिस्थितीचा विचार करूनच या प्रकल्पाबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे.

यावेळी शरद पवार साहेबांनी या विषयावर कोणत्याही घटकावर अन्याय होऊ देणार नाही मी कायम उजनी धरण परिसर व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे,अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE