रिपाई (आ) कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी गायकवाड याची निवड
प्रतिनिधी सुनिल भोसले
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी करमाळा तालुक्यातील यशवंतभाऊ गायकवाड यांची दिनांक ,16 ऑगस्ट 2020 रोजी रिपाई (A) कामगार आघाडी महाराष्ट्र जनसंपर्क कार्यलय, जिल्हा पुणे येथे रिपाई (A)चे कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदिपभाऊ कांबळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.


यावेळी पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडीचे कार्याध्यक्ष अमितजी कडाळे युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख बापुसाहेब गायकवाड, कामगार आघाडीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोषजी गायकवाड, पुणे जिल्हा हवेली कार्याध्यक्ष परवेज शेख तसेच करमाळा सोमनाथ गायकवाड भाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीत गायकवाड यांना निवडीचे पत्र देण्यात आले. गायकवाड याच्या निवडीची शिफारस पश्चिम महाराष्ट्र सर्पंक प्रमुख बापुसाहेब गायकवाड यांनी केली तसेच सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य अविनाशजी महातेकर व महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे याच्या आदेशानुसार कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदिपभाऊ कांबळे यांनी निवड केली.