करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

“या” मार्गावर महामंडळाने विना वातानुकूलित आसनी शयानयान बस सुरु

 करमाळा समाचार 

 

राज्य परिवहन करमाळा आगारातुन रातराणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या करमाळा – मुंबई या मार्गावर महामंडळाने विना वातानुकूलित आसनी शयानयान (सीटर कम स्लीपर) ही बससेवा दि.09/09/2020 पासून सुरू होत आहे.

दररोज रात्री सात वाजता ही बस करमाळा येथून सुटेल व पहाटे पाच वाजता मुंबई येथे पोहोचेल. तसेच मुंबईहून ही बस रात्री 9.45 वाजता सुटेल व करमाळा येथे सकाळी 6.30 वाजता पोहोचेल.

या बस चा सिटिंग आणि स्लीपर साठीचा तिकीटदर सारखाच आहे. ही बस रिझर्व्हेशन साठी देखील उपलब्ध आहे.
तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांनी केले.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE