करमाळासोलापूर जिल्हा

आदिनाथ कारखान्याच्या कार्यक्रमात थोडेसे लांबच दिसले आबा ; निवडणुकीतही स्वबळाची भुमीका केली स्पष्ट

करमाळा समाचार -संजय साखरे


करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाची कामधेनू असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची येणारी पंचवार्षिक निवडणूक पाटील गट स्वबळावर लढणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले.

आज कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ संपन्न झाला .त्यावेळी माजी आमदार पाटील पत्रकारांशी बोलत होते. या दरम्यान पत्रकारांनी करमाळ्यातील राजकारणासंदर्भात विचारलेल्या अनेक प्रश्नांना माजी आमदार पाटील यांनी उत्तरे दिली.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात सध्या बागल गटाची सत्ता आहे त्यामुळे शासनाची पत्रव्यवहार करताना संचालक मंडळ आणि चेअरमन यांची आवश्यकता भासत होती या अनुषंगाने आम्ही दोघांनी मिळून कारखान्याच्या कामकाजा संदर्भात शासनाशी पत्र व्यवहार केला. मात्र प्रत्येकाचे वैचारिकता वेगवेगळी असल्याने कारखान्याचा कारभार करताना अडचणी येतात.

*श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर पार पडले बॉयलर पुजन ; नकळत घडल्या बऱ्याच घडामोडी – खरच बागल व पाटील गटात सगळे अलबेल आहे का ? हजर राहुल सुद्धा पुजेपासुन लांब का राहिले पाटील ? येणाऱ्या निवडणुकांबाबत काय म्हणाले नारायण पाटील ?*

कारखान्याचा कारभार करताना एक मुखी सत्ता असली तर अडचणी येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ज्यादा दर देता येणे शक्य होते. यामुळे येणारी निवडणूक ही पाटील गट स्वबळावरच लढणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

कारखाना उभारणीसाठी कै. कर्मवीर गोविंद बापू पाटील, कै. रावसाहेब पाटील, कै. पन्नालाल लुणावत, कै. गाडगे, कै. गिरीधर दास देवी या नेत्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. त्यामुळे कारखान्याचा कारभार करत असताना या नेत्यांनी घालून दिलेल्या आदर्शाचा अवलंब करूनच या कारखान्याच्या बॉयलर मधून सोन्याचा धूर काढू व करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवन सुखी व समृद्ध करू असेही माजी आमदार पाटील म्हणाले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE