करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

करमाळा बंद करण्यापेक्षा कोविड सेंटरला व्हेटिलेटर ऑक्सिजनसह इतर सुविधा पुरविण्याची मागणी

प्रतिनिधी सुनिल भोसले


करमाळा कोंविड सेंटरला व्हेंटिलेटर ऑक्सिजन व इतर सुविधा उपलब्ध करण्याची मागणी माजी नगरसेविका सविता कांबळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदन ई-मेल द्ववारे देण्यात आले. 

पुढे निवेदनात म्हटले आहे, करमाळा कोविंड सेंटरला व्हेंटिलेटर ऑक्सिजन व इतर सेवा पुरवण्याची व्यवस्था करावी. करमाळा तालुका वगळता सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी, बार्शी , अकलूज सेंटरवर ऑक्सिजन व विविध सेवांची उपलब्धता होत आहे. पण करमाळा कोवीड सेंटरला या सुविधांची उपलब्धता झाली नाही. करमाळा तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत असल्याने मृत्यूचा दर सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील विविध संघटना करमाळा बंद करत आहे. परंतु बंदचे आवाहन करण्यापेक्षा सेंटरला व्हेंटिलेटर ऑक्‍सिजन व इतर अत्यावश्यक सुविधा वेळोवेळी पुरवल्या तर कोरोना
रुग्णांचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल. तरी आपण या विषयाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे निवेदनाद्वारे सविता कांबळे यांनी म्हटले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE