करमाळासोलापूर जिल्हा

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी ‌उठवावी अन्यथा केद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

प्रतिनिधी सुनिल भोसले

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी पंधरा दिवसांच्या आत ताबडतोब उठवावी अन्यथा केद्र सरकारच्या प्रतिमात्क पुतळ्याचे दहन करण्यात येईल अशा इशारा शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

पुढे बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांनी कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर पिकवले आहे. शेती मध्ये किती कष्ट करावे लागते आणि शेवटी आपला पिकविलेला माल विकण्यासाठी धडपड करावी लागते जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी घाम गाळुन कष्ट करत असतो आणि शेवटी पिकविलेला माल विकताना सुद्धा तेवढेच कष्ट करावे लागते. केद्र सरकारने लक्षात घेतले पाहिजे म्हणून केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांना सतत कांदा पिकांमध्ये तोटा सहन करावा लागत आहे.

कांदा शेती परवडत नाही परंतु हे सरकार शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दुप्पट भाव देऊ अशी घोषणा केली होती. परंतु ती घोषणा पोकळ ठरली आहे. आता तरी केंद्र सरकारला गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे म्हणून शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने केद्र सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत.

यावेळी अण्णासाहेब सुपनवर, अनिल तेली, भागवत दुधे, सुनील खाडे, आप्पा भोसले, शहाजी ठोसर आदी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE